आज फार मोठा ऐतिहासिक दिवस आहे मंडळी ..
आजच्याच दिवशी तो पावनखिंडीतील चित्त थरारक दिवस घडला.
६ हजार विरुध्द ३०० जण लढलेच कसे असतील.....?
काय माणसे असतील ती......?
काय ती मंतरलेली रात्र असेल.....?
खरंच! शब्दानाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात...
पन्हाळ गडाहून अंधाऱ्या रात्रीत पळत त्या पावनखिंडीत यायचे तेही आडवाटेने. अंतर सहज ४०-५० कि.मी. असेलच की. रात्रभर धावायचे आणि पुन्हा हातात हत्यारे घेऊन शत्रूशी दोन हात करायचे ३०० विरुध्द ६ हजार....कसा मेळ बसायचा.....?
लढाईचे परिणाम काय होणार हे त्या ३०० जणांना माहित असणारच की, आपण कापले जाणार , मरणार. पण तरीही लढणार, कसली माणसे होती ती, या असल्या नरवीरांच्या मुळे मंडळी आज आपण ''मराठा '' म्हणवून घेत आहोत. ६ तास अखंड झुंज द्यायची...
त्या आधी रात्रभर धावायचे ....
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते विचार करता करता...
" तोफांचे आवाज कानावर पडत नाहीत तोवर आमच्या बाजींनी जीव सोडला नव्हता...
" प्रत्यक्ष यमदेव त्या पावन खिंडीत तोफांचे आवाज होईपर्यंत थांबला होता, " त्या यमालाही वाट बघायला लावणारी माणसे या महाराष्ट्राच्यामातीने जन्माला घातली " ....
" मंडळी हे स्वराज्य सुखाने नाही मिळाले .. हजारो प्राणांचे बलिदान आहे यामागे. नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा.....!!
* अभिमानाने शेयर करा.....
* आपला इतिहास हाच महाराष्ट्राचा खरा दागिना आहे !!
No comments:
Post a Comment