Navin Marathi Charolya

तुला हो म्हणायला मी कधीची आहे रेडी,
पण पायात ही अडकली आहे करियरची बेडी.

ही आपली अबोल प्रीती वास्तविक सुंदर असु दे,
पण स्वप्नात का होई ना एकदा तरी खुलू दे.

गुंतत चालले मी तुझ्या प्रीतीच्या जाळ्यात
पण लक्ष आहे तळ्यतमळ्यात

तू नाही तेथे असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरात
तुझा आभासच प्रत्यक्षात अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही जिवलग आहे जरा

तुझी प्रातिबंब अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रीती तिला जाणवते तरी
पण माझे मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल तुला ही अन होशील माझी कधी तरी.

छंद :

लाविलास तू मजला काय तुझा छंद,
त्या मध्ये विसरलो मी “गोविंद”
तुझाच ध्यास, तुझाच वर्ण,
आता वावरतो मी मुक्त.

दोन डोळ्यांनी केली
किती ही मोहीनी
कवीच्या लेखणीतून
दिसे त्यांची महान कलाकृती .

प्रेमात पडण्यासारखं काही नव्हतं माझ्यात
ताब्यात होत बरच काही
माझ्या या विलक्षण विचित्र स्वभावाला
तुझ्याकडे आहे का औषधे खरच काही….

माझीया मना
नाद सोड आता
ती तुझी नाही
मान्य कर आता

तिचं ते खोटे बोलणे :

तिचं ते खोटे बोलणे
बोलताना दूसरी कडेच पाहणे
मधेच खाली पाहून लाजणे
लाजताना मग पुन्हा हसणे

वण आयुष्याचे शब्दात उतरवले :

वण आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रू पिऊन जीवन माझे जगवले
आनंद तर कधी न मिळाले आयुष्यात
वेदनानाच मी प्राणप्रिय यार बनवले

नशीब :

सुखाची चटक लागली कि
मनाला वेदना सोसवेनास होत.
आपल्या आभाळभर महत्वाकांक्षानी
आपलच नशीब आपल्यावर उलटत.

तुझ्या साठी मी जन्म घेतला नवा :

तुझ्या साठी मी जन्म घेतला नवा
आटापिटा करून शोधिला तुझा थवा
परमेश्वरला दिला रुपया सव्वा
आता तू मला भेटशीन केव्हा



संस्मरण :

येणारा दिवस कधीच तुझ्या संस्मरणा शिवाय
येत नाही
दिवस अगदी गेला तरी तुझी संस्मरणा शिवाय
जात नाही.

सांगितले खूपदा तुला :-

सांगितले खूपदा तुला …,
तरीही अर्थ प्रेमाचा कळलाच नाही …
प्रेमात सर्वात महत्वाचा असतो तो विशवास …,
तोही माझ्यावर तु ठेवलास नाही

एक smiley रूसलेला..
त्या दिवशी सकाळीच mail वर,
एक unread email वाट पाहत बसलेला
आणी होता त्याच्यासोबत एक smiley रूसलेला..

क्षण असा एकही जात नाही
की तु माझ्या सोबत नाही
नेहमीच असते मी तुझया सहवासात
सारखाच ध्‍यास असतो तुझयाच मनात

तुला गप्‍प राहा म्‍हणते खरी
पण तु गप्‍प झालास की होते कावरी-बावरी
तु माझा प्रत्येक स्‍पर्श सदा अनुभवतोस
अगदी सभोवतालच्‍या गर्दीत सुध्‍दा

आपण जुणु फक्त दोघंच असतो
कधी मैत्रिचे बंध कधी प्रीतीचे बोलणे
कधी तक्रारीचा सुर नाही तर रागावणे

प्रेम कसे करावे याचे
देखिल क्लासेस आहेत…
फेल होणा-यांचा हातातहि
दारुन भरलेले ग्लास आहेत..!

श्रावण सरीही मित्र आता
परक्यासारख्या वागतात
उनपावसाच्या मतलबी खेळात
आपल्याच डोळ्यातून सरतात

तुझ्या आणि माझ्यामध्ये आता
फक्त इतकेच अंतर उरले
जसा पाऊस येऊन सरून गेलाय
आणि अश्रु मात्र माझेच नीरस राहीले

प्रेम जेव्हा उमलत होत
तेव्हाच सारं बरसत होत
आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला
तेच तेव्हा तेव्हा फसवत होतं….