बागेमध्ये असतात, गूलाबांच्या कळ्या,
गणपतरावांचे दात म्हणजे दूकानाच्या फ़ळ्या.
लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास.
आजघर माजघर, माजघराला नाहि दार,
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार.
कर्दळिच्या वनात चंडोल पक्षी लपला,
……..शी लग्न करून झाला जन्माचा धुपला.
कंप्युटरला हवी असते फ़्लॉपी डिस्क,
हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क.
रेशमी सदर्याला प्लास्टिकचे बक्कल,
गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.
समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू,
गणपतरावं दिसतात साधे, पण आतून आहेत एकदम चालू.
लाडाने जवळ केले, केली जरा घसट
गणपतरावं एकदम खेकसले, फ़ारच बाई तिरसट !
बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
***** रावं बिड्या पितात संडासात बसून.
आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकून..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकून..
आणि ……. रांवाना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..!!
MSEB च्या तारेवर टाकला होता आकोडा…
लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!
अमेरिकेचे प्रेसिडण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच आमचे **** राव एकदम खुष !!
For More Visit.......
Facebook Page:-https://www.facebook.com/marathikhichadi
Blog - http://marathikhichadi.blogspot.com
Twitter :-https://twitter.com/MarathiKhichadi
Facebook Page:-https://www.facebook.com/marathikhichadi
Blog - http://marathikhichadi.blogspot.com
Twitter :-https://twitter.com/MarathiKhichadi