सहज वाचनात आलेली वात्रटिका

मांसाहार बंदी ....? ? ?

मी काय खायचे,
मला ठरवू दे भाई !
जेवणच जात नाही,
ताटात नसेल जर सुरमई !

आमचा निरोप जरा,
त्याना हि कळवा !
शुक्रवारी नाहीतर रविवारी
लागतो आम्हाला हलवा !

तुम्हाला काय पाळायचे
ते पाळा हो शेट !
सांगून ठेवलय कोळणीला,
बुधवारी आण पापलेट !

मराठी माणूस हाय साधा,
म्हणा हव तर रांगडा !
थांबणार नाही हो तो
खायचा असेल जर बांगडा !

कष्टकरीच तो, त्याला
आवडतो हो मटन चाप !
डिवचू नका त्याला,
नाहीतर कराल नक्की पश्चाताप !

No comments:

Post a Comment