थोडे पुण्याबद्दल

असे घडले पुणे...
सन 754 : पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय'
सन 993 : 'पुनवडी' हे पुण्याचे नाव पडले.
सन:1600 मुळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते.
सन 1637 : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली -सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या.
सन 1656 : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते.
सन 1663 : मंगळवार पेठ वसली.
सन 1703 : बुधवार पेठ वसली.
सन 1714 : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.
सन 1721 : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुर्नबांधणी सुरू.
सन : 1730 : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला.
सन 1734 : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसविली
सन 1749 : पर्वती वरील देवालय बांधले.
सन 1750 : वेताळ पेठ वसविली,कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या.
सन 1755 : नागेश पेठ वसविली.पर्वती तळे बांधले.
सन 1756 गणेश व नारायण पेठा वसविल्या.
सन 1761 : लकडी पूल बांधण्यात आला.
सन 1769 : सदाशिव व भवानी पेठा वसविल्या गेल्या.
सन 1774 : नाना,रास्ता व घोरपडे पेठा वसविल्या.
सन 1790 : फडणवीस वेस उभारण्यात आली.
सन 1818 : इंग्रजी अंमल सुरू.खडकी कटक स्थापना.
सन 1856 : पुणे मुंबई लोहमार्ग सुरू झाला
सन 1857 : पुणे नगरपालिकेची स्थापना.
सन 1869 : सर डेव्हिड ससून रूग्णालय कार्यान्वित
सन 1875 : संगम ( वेलस्ली) पूल वाहतुकिस खूला
सन 1880 : खडकवासला धरण बांधून पूर्ण
सन 1881 ते 1891: मुठा उजवा कालवा खोदण्यात आला.
सन 1884 : डेक्कन कॉलेजची स्थापना.
सन 1885 : फर्ग्यसन महाविद्यालयाची स्थापना
सन 1886 : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाला
सन 1915 : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले
सन 1916 : नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती घेतले.
सन 1915 ते 1925 : लक्ष्मी व टिळक रस्ता तयार व त्यांची सुधारणा.
सन1919 : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती घेण्यात आली.
सन 1921 : पुण्याला वीजपुरवठा सुरू.नव्या पुलाचे बांधकाम
सन 1941 : सिल्व्हर जुबिली  मोटर ट्रान्सपोर्ट तर्फे नागरी बससेवा सुरू.
सन 1950 : पुणे महानगरपालिकेची स्थापना.पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू
सन 1952 : पुणे विद्यापीठाची स्थापना.
सन 1953 : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू
सन 1961 : पानशेत धरण फुटले.
सन 1973 : सिंहगडावर टी.व्ही.टॉवर सुरू झाला.पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.

No comments:

Post a Comment