सुनेने आरशात लिपस्टिक सरळ
करतच म्हटले,
'सासूबाई,
तुम्ही तुमचे जेवण बनवून घ्या.
मी,रोहन आणि हे आज एका
लग्नाच्या पार्टीत जात आहेत.'

वृद्ध सासूने सांगितले,
'अगं सूनबाई,
तुला तर माहीत आहे ना,
की मला या गेसवर जेवण बनवायला जमत नाही.'

यावर लागलीच मुलाने आईला सांगितले.
'आई, एक काम का करत नाहीस तू.
जवळच एक मंदिर आहे.
तेथे आज भंडार आहे.
तू तिकडेच जा आणि जेवून ये.
म्हणजे जेवण बनविण्याचा प्रश्नच
येणार नाही.'

'आईने काहीही न बोलता पायात चप्पल घातली
आणि सरळ मंदिराच्या दिशेने चालू लागली.'

ही सगळी घटना त्यांचा मुलगा रोहन बघत होता.
पार्टीमध्ये जाण्याकरिता तिघंही गाडीत बसले.
तेव्हा काहीतरी विचार करत करतच
मुलाने वडिलांना सांगितले,

पप्पा-मम्मी मी जेव्हा खुप मोठा श्रीमंत माणूस बनेन
तेव्हा मीही माझे घर एखाद्या मंदिराजवळ घेईन.
कारण माझे तुम्हा दोघांवर खूप प्रेम आहे.

मम्मीने लगेचच मुलांचे हे बोलणे ऐकून
उत्सुकतेने विचारले.
का रे बाळा रोहन ?'

रोहनने यावर असे काही उत्तर दिले की,
दोघांचीही मान शरमेने खाली गेली.
रोहनने म्हटले,
'कारण मम्मी जेव्हा मलाही कधी माझ्या बायकोबरोबर
एखाद्या लग्नात किँवा पार्टीत जायचे असेल
तेव्हा तुम्हालाही अशाच प्रकारे एखाद्या
मंदिरात भंडाऱ्‍याला जेवायला जावे लागेल
आणि म्हणूनच तुम्हाला अधिक लांब जाण्याचा त्रास
होऊ नये म्हणून मी माझे घर मंदिराजवळ घेईन.

<<<<<< तात्पर्य >>>>>>

दगड तोपर्यँत सुरक्षित राहतो जोपर्यँत
तो डोंगराबरोबर राहतो.

पान तोपर्यँत सुरक्षित राहते जोपर्यँत
ते झाडाबरोबर राहते

आणि माणूस तोपर्यँत सुरक्षित राहतो जोपर्यँत
तो कुटुंबाबरोबर राहतो;

कारण कुटुंबातून विभक्त होऊन स्वातंत्र तर मिळते,
पण संस्कार मात्र लोप पावतात...!

No comments:

Post a Comment