मतदार

एके दिवशी हिटलर एक कोंबडं घेऊन मंत्रीमंडळाच्या बैठकीत आला. कोंबड्याचं मुंडकं हिटलरने आपल्या बगलेत दाबून धरले होते. आणि तो चालत चालत त्या कोंबड्याचे एक एक पंख उपसून काढत होता. कोंबडा जीवाच्या आकांताने ओरडत होता. तो हिटलरच्या बगलेतून सुटका करू पाहत होता. पण हिटलर त्याला न सोडता त्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता पंख उपसत होता. मत्रीमंडळातील सदस्य हिटलरला म्हणत होते, "त्या मुक्या प्राण्याला असा त्रास देऊ नका. सोडा त्याला." पण हिटलर कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. शेवटी सर्व पंख उपसून झाल्यावर त्याने त्या कोंबड्याला खाली फेकले. आणि खिशातून काही दाणे काढून, तो कोंबड्याला खाऊ घालू लागला. अशा अवस्थेत कोंबडा ते दाणे खाण्यासाठी पुन्हा हिटलरच्या हाताकडे बघू लागला. 
हिटलर देखील त्याला दाणे खाण्यासाठी जवळ बोलावू लागला. आणि थोड्या वेळाने ते थोडे फार दाणे खाण्यासाठी तो कोंबडा हिटलर जवळ येऊन बसला. इतका वेळ जो कोंबडा हिटलर पासून सुटका करून घेत होता, तोच कोंबडा चार दाण्यासाठी हिटलर च्या पुन्हा जवळ बसला. मंत्रीमंडळातील सर्व लोक त्याला म्हणाले की, "हा काय प्रकार आहे ?" त्यावर हिटलर म्हणाला, "मतदार हे असेच असतात. साडेचार वर्ष आपण त्यांचे पंख उपसायचे असतात. आणि शेवटी सहा महिन्यांत त्यांना चार दाणे टाकायचे असतात. या चार दाण्याच्या नादात हे मतदार, साडेचार वर्षांत आपण केलेले सर्व अन्याय विसरून जातात. आणि आपल्यालाच मतदान करतात."

No comments:

Post a Comment