Dr. A. H. Salunkhe Sir
(डॉ. आ. ह. साळुंखे) -

आपल्या भारतीय शिक्षणव्यवस्थेचे स्वतःला बुद्धीजीवी समजणाऱ्या मुर्ख
लोकांनीच बारा वाजवलेत...

पहा ते कसे...

शाळेत पहीला तास मराठीचा
शिक्षक शिकवितात
-ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंत हवेत
चालवली.

दुसरा तास विज्ञानाचा
शिक्षक शिकवितात -
निर्जीव वस्तुला चेतना नसल्यामुळे ती
जागची हलु शकत नाही.

परीक्षेत प्रश्न आला
चूक कि बरोबर ते लिहा....
प्रश्न- निर्जीव वस्तू हालचाल करू शकते ??
आता बोला विद्यार्थ्याने परीक्षेत काय
उत्तर लिहायचे ?
चूक कि बरोबर ?
आणि जरी कसेबसे त्याने उत्तर लिहिले तर
त्याला कोणत्या दर्जाचे शिक्षण मिळाले
हे आपल्याला कळलेच असेल .

आता तो जागतिक स्पर्धेच्या युगात टिकेल
काय??
अजिबात नाही !
आमच्या राष्ट्राची प्रगती होत नाही
कारण हेच...
आमच्या शिक्षणव्यवस्थेवर स्वतःला
बुद्धीजीवी समजणाऱ्या मुर्ख लोकांचे
नियंत्रण आहे....

भटशाहीचे स्तोम माजवण्यासाठी
भ-भटजीचा,
य-यज्ञाचा
आम्हाला लहानपणापासून शिकववतात आणि
अज्ञानाचा पाया घट्ट करतात.....

यांचे उच्चाटन केल्याशिवाय राष्ट्राची
प्रगती शक्यच नाही.....

अमावस्या आली की बाजारात
"काळ्या बाहुल्या"
(त्याला मिरची,
बिबवा, लिंबू इत्यादि साहित्य
बांधलेलं असत) विक्रीला येतात.
काही अनर्थ घडू नये म्हणून
अमावास्येला घरावर किंवा दुकानावर काळ्या बाहुल्या टांगल्या जातात.मोठ्या बिल्डींगवर अवाढव्य
बाहुल्या टांगल्या जातात. पण
या भारतात

छत्रपती शिवाजी महाराज एकमेव
विज्ञानवादी राजा झाले.
शिवरायांनी ३५० किल्ले बांधले
पण अमावस्येला एकही किल्ल्यावर
"काळी बाहुली" टांगली नाही.
तरीसुद्धा काहीच अनर्थ घडला नाही. जे
शिवरायांचे मावळे नाहीत ते
आजही २१ व्या शतकात
अमावस्येच्या रात्री घराच्या बाहेर
पडायला घाबरतात. पण छत्रपती शिवरायांनी अमावास्येच्या रात्री गडद काळ्या अंधाराच्या फायदा  करून शेकडो लढाया जिंकल्या.
या घटनेवरून शिवरायांच्या आजच्या मावळ्यांनी बोध घ्यावा...

No comments:

Post a Comment